बुद्धीवर्धक
- वावडींग-वेखंड, गुळवेल,हिरडा, आघाडा, बडीशोप व शतावरी हे सर्व समभाग घेऊन कुटून चूर्ण तयार करावे. रोज सकाळी अनशेपोटी चिमुटभर चूर्ण गाईच्या ४ चमचे तुपाबरोबर नियमित महिनाभर चाटावे.
- ५ बदाम रात्री पाण्यात भिजत टाकावे. सकाळी त्यांचे साल काढून, वाटून गायीच्या कपभर दुधात एकजीव करून रोज सकाळी अनशेपोटी ४१ दिवस हे बदाम मिश्रीत दूध प्यावे.
- तुळशीची ५ पाने सकाळी पण्याबरोबर नियमित ४१ दिवस खावीत.
- तुळशीची १० पाने, ५ मिरे व ४ बदाम बारीक वाटून मधासह रोज सकाळी अनशेपोटी नियमित ३ महीने चाटावे.
- लासणाच्या सोललेल्या ५ पाकळ्या ठेचून, साजूक तुपात तळून रोज सकाळी अनशेपोटी व रात्री नियमित ४१ दिवस खावेत.
- चिमूटभर वेखंड चूर्ण, गायीचे चमचाभर तूप,थोडे खोबरे व ३ बदाम एकत्र करून रोज सकाळी महिनाभर खावेत.
- वेखंड मधात उगाळून सकाळी व रात्री चाटावे.
स्मरणशक्तीवर्धक
- बदाम व बडीशोप प्रत्येकी २५० ग्रॅम घेऊन, एकत्र वाटून ठेवावी. रोज सकाळ-संध्याकाळ हे औषध १० ग्रॅम प्रमाणात पण्याबरोबर नियमित चार महीने खावे.
- खसखस व धणे सम प्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे. तेवढीच खडीसाखर एकजीव करून खलावी हे चूर्ण सकाळी व रात्री एक चमचा प्रमाणात कोमट दुधासह नियमित एक वर्षे घ्यावे.
- ५०० ग्रॅम काळे तीळ, बदाम, काळे मनुके,पिंपळी व सुके खोबरे प्रत्येकी १०० ग्रॅम घेऊन एकत्र करून वाटावेत. हे मिश्रण रोज सकाळी अनशेपोटी २५ ग्रॅम प्रामाणात नियमित ३ महीने खावे. या उपायाने शक्ती, बुद्धी व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊन पचनशक्तीही सुधारतो.
- हिवाळ्यात सकाळी अनशेपोटी २५ ग्रॅम काजू खावून चार चमचे मध चाटावे.
- गायीचे १०० ग्रॅम तूप व १० ग्रॅम वेखंड चूर्ण एकत्र करून २ चमचे मिश्रण रोज रात्री नियमित ४१ दिवस घ्यावे.
- आवळा चूर्ण व शंखपुष्पीचे चूर्ण चमचाभर प्रमाणात एकत्र करून रोज रात्री नियमित पण्याबरोबर महिनाभर घ्यावे.
- ४ बदाम कपभर पाण्यात भिजत टाकून सकाळी साल काढून वाटावेत. त्याच कपभर पाण्यात ते एकजीव करून हे बादमयुक्त पाणी प्यावे. हा उपाय महिनाभर करावा.
- वेखंड दुधात उगाळून चमचाभर चाटण रोज पहाटे नियमित ४१ दिवस चाटावे.
वजन कमी करण्यासाठी
- ग्लासभार पाण्यात दोन चमचे मध टाकून दिवसातून ३ वेळ प्यावे.
- लसणाच्या सोललेल्या पाकळ्या, आल्याचा रस, सेंधव, तुपात तळलेला हिंग हे सर्व एकत्र वाटून रोज रात्री असे ३० दिवस खावे. (पोटावर साचलेली चरबी कमी होते.)
- लिंबू रस व मध प्रत्येकी २५ ग्रॅम एकत्र करून ग्लासभार पाण्यात मिसळून जेवणानंतर लगेच प्यावे. रोज दोन्ही जेवणानंतर नियमित ३ महीने घ्यावे.
- १ लिंबुचा रस व १० ग्रॅम मध एकजीव करून रोज सकाळ-संध्याकाळ नियमित दोन महिने चाटावे.
- मध १ चमचा, आले रस एक चमचा व लिंबू रस १२ चमचे घेऊन हे सर्व अर्धालिटर गरम पाण्यात मिसळून पहाटे प्यावे व परत झोपावे. हा उपाय नियमित सहा महीने केल्याने वजन हळूहळू कमी होते.
- सुंठ, मिरे व पिंपळीचे एकत्रित चमचाभर चूर्ण रोज सकाळी कोमट पण्याबरोबर ४१ दिवस घ्यावे.
- जायफळाचा कपभर काढा, चार चमचे मधबरोबर रोज रात्री नियमित असा ६१ दिवस प्यावा.
१ चमचा त्रिफळा चूर्ण घेऊन ते बहिजेल एवढे गायीचे तूप किंवा मध टाकून रोज सकाळ-संध्याकाळ महिनाभर खावे