गूळ हा चवीला गोड असल्यामुळे तो सर्वांनाच खायला आवडतो व प्रत्येकाच्याच घरात असतो. याचे फायदे व तोटे खूप कमी लोकांना माहीत असतात. गूळ ह उष्ण असतो. त्यामुळे गर्भवती स्त्रीने तो खाण्याचे टाळावे. विज्ञानानुसार गोड खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्तसंचार वाढतो. ऊर्जा मिळते. यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी गूळ खावा. तसेच गोड खाल्ल्याने तुमचे मन शांत राहते व शांत मनाने काम केल्यास यश निश्चितच मिळते.
अतिप्रमाणात गूळ खाणे चांगले नाही त्यामुळे मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. गुळाला आयुर्वेदातही महत्व प्राप्त झाले आहे. त्यानुसार सर्दी, कफ यासारख्या आजारांवर गूळ फायदेशीर असतो. गूळ हा उष्ण असतो, म्हणूनच हिवाळ्यात तीळगुळाचे लाडू खाणे शरीरसाठी लाभकारी ठरते.
आपल्या शरीरसाठी अनेक पदार्थ फायदेशीर ठरतात. अनेकदा गोड खाण्यापासून रोखले जात असले तरी नैसर्गिक गोड पदार्थ शरीरासाठी चांगले असतात. गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे तुम्हीही साखरेपेक्षा गूळ खाण्यास प्राधान्य द्या.
विशेषत: ऊनहातून आल्यानंतर पाणी पिण्यापूर्वी थोडा गूळ खा आणि नंतरच पाणी प्या. तुम्ही तुमच्या आजीकडून गूळ खाण्याचे अनेक फायदे ऐकले असतील. पण आज आणखी काही लाभ जाणून घ्या. गूळ खाण्यासाठी चविष्ट तर आहेच, शिवाय तो आरोग्याच्या दृष्टीनेही खंजिन्यासारख आहे. गुलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो बाजारात सहज उपलब्ध होतो.
गूळ शरीरात पॉवर बुस्टर म्हणून काम करतो. गूळ मानवी शरीराचे नियमन तर करतोच पण ते डिटॉक्सिफायही करतो. त्यात पाणी, प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्व बी, लोह आणि फॉस्फरस असतात. १० ग्रॅम गुळात सुमारे ३८ कॅलरीज असतात. गुळात भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात. त्यामुळेच ‘साखरेपेक्षा गूळ खा आणि आरोग्यसंपन्न रहा’ असा सल्ला दिला जातो.
अमेरिकेत झालेल्या एका संशोधनावरुण असा निष्कर्ष निघाला की जे लोक जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करतात, त्यांना मोठ्या अंतदयचा कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते. कॅन्सरच नव्हे, तर साखर इतर अनेक रोगांचे कारणदेखील आहे. त्यामुळे याच्या सेवनावर नियंत्रण घालणे अत्यावश्यक आहे. साखरेऐवजी रासायनिक मिश्रणरहित शुद्ध गुळाचा उपयोग स्वास्थ्यासाठी उत्तम आहे.
गुळात कॅल्शियम असल्यामुळे मुलांच्या हाडांची कमजोरी व दंतक्षयामध्ये गूळ खूप लाभदायक आहे. वाढत्या मुलांसाठी गूळ अमृततुल्य आहे. पोटॅशियम हृदयरोगात लाभदायक असते. हे गुळात मुबलक प्रमाणात असते.