जिरे खाण्याचे आयुर्वेदिक फायदे /Ayurvedic benefits of Cumin seeds

      उन्हाळ्यात जीव घाबरणे, चक्कर येणे, भूख न लागणे, हागवण  इत्यादी गोष्टी फारच सामान्य असतात. अशात गर्मीत होणाऱ्या या समस्यांसाठी काही घरगुती उपचार करून तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो. जीऱ्यामुळे फक्त जेवणाचा स्वादच वाढत नाही तर त्यामुळे बरेच आजार दूर होऊ शकतात.   

      जिऱ्यामध्ये अंटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पोटॅशियम, मँगनीज. कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक विटॅमीन असतात. जाणून घ्या जिरे खाण्याचे फायदे:

  • त्वचेसाठी – जिरं हे ब्युटी बुस्टर म्हणून ओळखलं जात. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि विटॅमिन्स आढळतात. जे त्वचेच्या विटॅमिन्स ई  च्या गरजेला पूर्ण करतात. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या विटॅमिन्स ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही जिऱ्याच पाणी रोज घेतल्यास तुमच्या चेहऱ्यावरील  अॅक्नीची समस्या दूर होईल. जिऱ्यामध्ये अॅन्टी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेच कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन पासूनही रक्षण होतं. त्याशिवाय जिऱ्याचा  उपयोग हा सोरायसिस आणि एक्झिमा हे आजार दूर करण्यासाठीही केला जातो. तुम्ही हवं असल्यास जिरा पावडरच्या वापर फेसपॅकमध्येही घालूनही करू शकता.
  • केसांसाठी – त्वचेला सुंदर करण्यासाठी जसे जिऱ्याचे फायदे आहेत. तसचं केसांसाठीही आहेत. केसांसाठी बाजारात जिऱ्याचाच  वेगळा प्रकार असलेलं काळ जिरं मिळतं. या जिऱ्याच तेल केसांना लावल्यास केस गळणं कमी होत. रोज काळ्या जिऱ्याच सेवन केल्यास केस दाट, काळे आणि मजबूत होतात. याशिवाय ज्यांना कोड्यांची समस्या असेल त्यांच्यासाठीही काळं जिरं फायदेशीर आहे. कोंडा दूर करण्यासाठी तेलासोबत जिरं गरम करून घ्या. या कोमट टेलणे केसांना मसाज करा. २ ते ३ वेळ हे तेल लावल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होईल.
  • ताप – तापामुळे जेव्हा शरीर दुखू लागतं. तेव्हाच आपल्याला आशक्तपनाही जाणवू लागतो. आशावेळी जिऱ्यासोबत गूळ मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी २ ते ३ वेळेस खा. याने ताप लवकर कमी होईल. तसचं तुम्ही ताप आल्यावर जिऱ्याच पाणी देखील घेऊ शकता. असे केल्याने जिऱ्यातील थंडाव्यामुळे अंगतील उष्णता त्वरित कमी होते आणि ताप लगेच उतरतो.
  • सर्दी – थंडीच्या दिवसात नाक बंद होण्याची समस्या खूप कॉमन आहे. पण काहीजणांना हा त्रास बरेच दिवस होतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी जिऱ्याचा वापर करायला विसरू नका. जिरं चांगल भाजून घ्या आणि त्याची एक पोटळी बनवून घ्या. मग ते थोड्या थोड्या वेळाने हुंगात राहा. असे केल्याने बऱ्याच आराम मिळेल आणि शिंका येण बंद होईल. तसंच जिरं हे बद्धकोष्ठता दूर करण्यात मदात करतं. बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी एक ग्लास ताकत  काळ मीठ आणि जिर भाजून टाकावे. असा केल्याने लवकर बार वाटेल.
  • पोटदुखी – अनेक कारणांमुळे पोटात कधीही दुखू शकत. जेव्हा पोटात असह्य दुखत असेल तेव्हा एकदा हा घरगुती उपाय नक्की करून पहा. जिर आणि साखर सम प्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण चावून चावून खा. चावल्यामुळे जिरयातून जो रस निघतो, त्या रसणे लगेच फायदा होतो.
  • सांधेदुखी – मेथी, ओवा, जिरं आणि बडीशोप सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. हे मिश्रण एक चमचा रोज खाल्ल्याने डायबीटीज, सांधेदुखी आणि पोटाचे विकार होत नाहीत. तसेच गॅस च्या समस्येवरही याचा फायदा होतो.
  • कॉलेस्ट्रॉल – आजकाल कॉलेस्ट्रॉल वाढल्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो. बरेच जणांच्या खण्यापिण्यावर यामुळे मर्यादा येतात. जिऱ्याच सेवन सेवन केल्यामुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.