लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) – स्वातंत्र्याचा जनक

‘स्वराज्य ध्येय तुझे तू स्वातंत्र्याचा पुजारी – ‘लोकमान्या’चा मान मिळाला तउजळ भारत भुवरी’. अशा पूज्य पुरुषाचे पुण्यस्मरण करताना मन उचंबळून येते.

‘धन्य धन्य ते भाळ आईचे शोभे मंगल टिळक, ज्या मातेच्या पोटी जन्मले- लोकमान्य टिळक’ अशी पवित्र भारत मत परकीयांच्या शृंखलेत अडकली होती. टी मुक्त होण्यासाठी टाहो फोडत होती. मातीचा कण न कण आपल्या मुक्ततेसाठी आवाहन करीत होता आणि ‘स्वराज्य  हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’. ही आसमंत दुमदुमून टाकणारी सिंहगर्जना केली होती त्या भारतीय सिंहाने! त्यावेळी सरकारच्या विरुद्ध शब्द उच्चारणे किती महाभयंकर होते. ते धडासच करत नव्हते कोणी ! पण हा निर्भयी “नरसिंह अत्याचाराचा खांब फोडून प्रकट झाला..”

‘स्वातंत्र्यात्सव जगणे मरणे ध्येय एक स्वातंत्र्य’, ‘केसरी’त गर्जना करुनी दिधला महामंत्र! नुसत मागून स्वातंत्र्य मिळण शक्यच नव्हते. त्यासाठी हवी होती जनजागृती आणि मनजागृती सुद्धा. हे जागृतीचे बीज मनामनात पेरले तर स्वातंत्र्याचा वृक्ष बहरणार हे त्यांना माहीत होते आणि म्हणूनच १८८० मध्ये पुण्याला ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. याच कॉलेजातून सेवाभाव, त्यागवृत्ती व कर्तव्यनिष्ठा यांचे कंकण बांधून अनेक देशभक्त तरुण लोकसेवा करण्यासाठी पुढे आले.

१८८१ साली केसरी व मराठा ही सप्ताहिके सुरू केली. लोकजागृतीसाठी गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केला. लाखों लोकांचे पाझर एकत्र करून त्याचा प्रचंड धबधबा करण्याची किंवा लाखों लोकांचे चेव संघटित करून साम्राज्यशाहिला सुरुंग लावण्याची ताकद फक्त टिळकांच्यात होती. कोण म्हणते तिलक असंतोषाचे जनक होते? तो तर भारतीय स्वातंत्र्याचा मूर्तिमंत साक्षात्कार होता.

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे निधड्या छातीने लिहिणारे ते वेगळेच व्यक्तिमत्व होते. ‘राज्य करणं म्हणजे सूड उगवणं नव्हे’. हा त्यांच्या लेखणीचा ज्वालाग्रही उफाळून येत होता.

अतुल धैर्य, प्रखर बुद्धिमत्ता, जाज्वल्य देशप्रेम या गुणांच्या जोरावर ते ‘स्वातंत्र्य’ मिळवण्यास सिद्ध झाले. पण दुर्दैव आमचे ! १ ऑगस्ट १९२० दिनी हा भारतमातेच्या सौभाग्यामयी तिलक देवाला प्रिय झाला.

एक महान चारित्राची पवित्र नदी रत्नागिरीत उगम पावली ती अखेर ब्रम्हार्पण झाली. आज स्वराज्य – सुराज्य लोप पावत चालले आहे. त्यांचे कार्य आपण पुनश्च आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया.