महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्यांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील कटगून हे होते. महात्मा ज्योतिराव फुले हे थोर विचारवंत होते. नावभरताच्या निर्मितीमध्ये ज्या महान भारतीय विचारवंतांनी आणि समाजसुधारकांनी महत्वाची भर घातली, त्यात ज्योतिबा फुले अद्वितीय होते. आधुनिक काळात लोकांनी त्यांना स्वयंस्फूर्तीने ‘महात्मा’ हा सन्मान अर्पण केला. ज्योतिबा हे स्वावलंबी, स्वतंत्र असे मौलिक विचारवंत व क्रांतिकारक होऊन गेले. एका सामान्य माळ्याच्या घरात जन्मलेला हा एक महापुरुष व समाजसुधारक होता.
तत्कालीन रूढीनुसार त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडूजी पाटील यांच्या ‘सावित्री’ नावाच्या कन्येशी झाला. ती खऱ्या अर्थाने ज्योतीबांची सहधर्मचारिणी बनली. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी पुरोगामी विचारसरणीने भारतात स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. त्यांनी शैक्षणिक, कृषी, जाती पद्धती, स्त्रियांचे आणि विधवांचे राहणीमान उंचवण्याच्या कमी भरीव कार्य केले. त्याकाळी उच्च, नीच, कनिष्ठ असा फार मोठा भेदभाव होता. या सर्व प्रकरांतील अंतर कमी करण्याचे कार्य त्यांनी केले.
स्त्रीशिक्षण, मागासलेल्या जाती-धर्मातील मुला-मुलींचे शिक्षण आणि सर्व जाती-धर्मातील मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला शिक्षण दिले. त्यानंतर सन १८४८ च्या ऑगस्ट महिन्यात पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. ब्राह्मण या उच्च जाती वर्गाकडून शूद्र आणि अतिशूद्र समाजाचे शोषण थांबवणे हा मुख्य उद्देश सत्यशोधक समाजाचा होता. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चतुरवर्णीय भेदभावस विरोध करण्यास सुरवात केली.
त्यांचा संपूर्ण विचार हा समतेच्या तत्त्वावर आधारित होता. १८८३ साली त्यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी शेती व शेतकऱ्याच्या दीनवन्य अवस्थेचे वर्णन केले आहे. शेतकरी कसा आर्थिकदृष्ट्या खचला आहे व भिकेला लागला आहे, याचे मर्मभेदक चित्रण त्यात आहे. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला ब्रिटिशांची संपूर्ण नोकरयंत्रणा, काळे-गोरे, भट-सावकार-कुलकर्णी जबाबदार असतात, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्याची स्थिति सुधारण्यासाठी त्यांना विद्या व यंत्राद्वारे शेती करण्याची समाज द्यावी, पशुपालन, शेतकऱ्यांच्या परीक्षा, स्पर्धा व बक्षिसे इ. उपायही त्यांनी सुचविले.
त्यांनी विचारांना कृतीशीलतेची साथ दिली. जातिभेदांचे निर्मूलन, सामाजिक समतेवरील भर, अस्पृश्यता निर्मूलन व बहुजनोदधाऱ् या सत्यशोधक समाजाच्या तत्वावरूनच त्यसंकहीस कसरीसची भसव्यसतस पटते. यासाठी त्यांनी दाखवलेली निर्भीडता, नि:स्वार्थीपणा, सहनशीलता, बंधुताही वाखाणन्यासारखी आहे. स्त्रिया, अस्पृश्य, शेतकरी यांच्यासाठी कार्य करताकरता अखेर २७ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगाचा निरोप घेतला.